बारामती तालुक्यात 19 कोरोना बाधीत

वतन की लकीर (ऑनलाईन): बारामतीत दि. 30 मे 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 05 तर ग्रामीण भागातून 14 रुग्ण असे मिळून 19 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.

काल बारामतीत 00 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 00 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 00 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 48 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.

काल दिवसभरात बारामतीत एकूण 19 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 24 हजार 259 रुग्ण असून, बरे झालेले 22 हजार 349 आहे. डिस्चार्ज 104 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 615 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.

काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 76 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 05 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. म्युकर मायकॉसिसचे एकुण 21 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 14 तर इतर तालुक्यातील 07 रूग्ण आहेत.

ज्या नागरिकांचे दुसरा डोस (कोवीशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेले आहेत व ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (दिवस पूर्ण) प्रलंबित आहे अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी लसीकरण सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!