वतन की लकीर (ऑनलाईन): बारामतीत दि. 21 मे 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 48 तर ग्रामीण भागातून 121 रुग्ण असे मिळून 169 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत. लस उपलब्ध नसल्यामुळे आज 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.
काल 612 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 102 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 9 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 108 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे.
काल दिवसभरात बारामतीत एकूण 169 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 23 हजार 051 रुग्ण असून, बरे झालेले 20 हजार 030 आहे. डिस्चार्ज 326 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 561 आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 194 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 34 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
मुंबईत 22 दिवसांत 2 लाख कोरोनामुक्त झाल्याचे दिलासादायक बातमी असुन पुणे शहरात दिवसभरात 931 नविन बाधितांची नोंद झालेली आहे.