वतन की लकीर(ऑनलाईन): खताचे दर वाढवणे म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे असल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांनी केंद्रीय खते आणि रसायनमंत्री सदानंद गौडा यांना पत्राविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱी अडचणीत सापडला आहे. त्यांनी करोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान शेतकर्यांना सामोरे जावे लागणार्या समस्यांचा व उभी ठाकलेली संकटे याचाही उल्लेख केला आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना मदत करायची सोडून खतांच्या किमतीत वाढ करुन सरकार त्यांच्या संकटात भर घालत आहे असंही पवार या पत्रात म्हणाले.
खतांच्या किमती वाढवण्याचा हा निर्णय धक्कादायक असून त्याचा पुनर्विचार करुन तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने करावा असंही या पत्रात लिहिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी या दरवाढीचा निषेध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी राज्यभरात आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.