अशोक घोडके यांजकडून…
वालचंदनगर(वार्ताहर): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणार्या विरोधात पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विनामास्क फिरणार्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना समज दिली जात असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी दिली आहे. परंतु नागरीक कोरोनाबाबत अजूनही योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे विना मास्क फिरणार्यांवर कारवाईचे सत्र सुरूच आहे. प्रशासनाने कोव्हिड-19 नियमांचे पालन न करणार्या विरोधात कडक कारवाईचे धोरण राबवणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.