जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती नगरपरिषदेद्वारा स्थापित मोफत विधी सल्ला केंद्र पूर्ववतपणे चालू

महिला व बालकल्याण सभापतीपदी होताच आशा मानेंनी केला महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

बारामती(उमाका): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन तसेच महिला व बालकल्याण सभापतीपदाचा पदभार स्विकारताच आशा दत्तू माने यांनी सोशल डिस्टन्सचे नियमाचे पालन करीत मोफत विधी सल्ला केंद्र पूर्ववतपणे चालू केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विधी सल्ला समितीच्या सदस्या ऍड.प्रिया गुजर-महाडिक,ऍड.किर्ती गाढवे, ऍड.सिमा लोंढे, महिला व बालकल्याण उपसभापती ज्योती सरोदे, शिक्षण मंडळ सभापती बेबीमरियम बागवान, तसेच नगरसेविका सीमा चिंचकर, मयुरी शिंदे, सौ.अनिता जगताप, सौ.पद्मावती दिंडे, वैशाली अक्कीवाटी इ. उपस्थित होते.

यावेळी ऍड.गुजर- महाडिक, ऍड.गाढवे, ऍड.लोंढे यांनी उपस्थित महिलांना कायदेशीर बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सर्व नगरसेविकांना आपापल्या प्रभागात महिलांकरीता मोफत कायदेविषयक शिबीर आयोजित करणेबाबत प्रोत्याहित करून त्याकरीता शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला व बालकल्याण उपसभापती सरोदे यांनी पाहुण्यांचे आभार मानले.
महिलांमध्ये जनजागृती व मोफत कायदेशीर सहाय्य, सल्ला देणेकरीता बारामती नगरपरिषद इमारतीमध्ये मोफत विधी सल्ला केंद्र स्थापन करण्यात आले होते. या केंद्रामार्फत आठवड्यातून एक दिवस मोफत मार्गदर्शन केले जात होते. मात्र कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्राचे काम विस्कळीत झाले होते. दर गुरूवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत मार्गदर्शन केले जाईल.

बारामती नगरपरिषद हद्दीतील महिलांनी निर्धास्तपणे कायदेशीर मदतीसाठी महिला व बालकल्याण विभागास संपर्क साधावा. – सौ.आशा दत्तू माने, सभापती महिला व बालकल्याण समिती, बा.न.प.

या कायद्याचा मिळणार महिलांना आधार…..
भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रीया संहिता, दिवाणी प्रक्रिया संहिता, हिंदू विवाह कायदा , हिंदू वारसा कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ 2013 कायदा, विशाखा समितीच्या मार्गदर्शक सूचना, गर्भपात कायदा, प्रसुतीविषयक कायदेशीर तरतूदी व सोईसुविधा, वारसाहक्क, सासरच्या व माहेरच्या संपत्तीमधील महिलांचा हक्क, पोटगीचा हक्क, पोस्को कायदा, भारतीय संविधानात महिलांकरीता केलेल्या विशेष तरतूदी इ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!