बारामती(वार्ताहर): बाळासाहेब ठाकरे जयंती बारामतीत उत्साहात पार पडली त्याप्रसंगी शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे व तालुका प्रमुख विश्वास मांढरे यांच्या हस्ते झाले.
त्यानंतर शिवसेना बारामती शहरच्या वतीने सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटलमध्ये तसेच शिवसेना महिला अघाडीच्या वतीने बारामती महिला हॉस्पिटलमध्ये फळे वाटप करण्यात आली. तसेच काटेवाडी शिवसेनेच्या वतीने महिलांना सड्या वाटप करण्यात आले.बारामती युवा सेनेच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आले तर शिवसेना वडगावच्या वतीने रोपे वाटप करण्यात आली तसेच शिवसेना तरडोली,चोपडज यांच्या वतीने वृक्षा रोपन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना समन्वयक भिमराव भोसले,निलेश मदने, सुदाम गायकवाड शहर प्रमुख पप्पू माने, निखिल देवकाते, शोकत बागवान,अविनाश कदम, महिला अघाडीच्या सुमिता खोमणे, संगिता पोमणे उपस्थित होत्या.