वतन की लकीर (ऑनलाईन): बारामती तालुक्यात एकुण 7 रूग्ण संख्या असून आज 107 आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. बारामतीच्या सर्व शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.
दुस-या टप्प्यात पोलिसांसह होमगार्ड, नगरपालिकेचे कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना लस दिली जाईल. तिस-या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह मधुमेह, रक्तदाब व इतर व्याधी असलेल्या रुग्णांना लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर त्यास वैद्यकीय अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी बाटली आहे. या एका बाटलीत दहा जणांना लसीकरण होते. बाटली उघडल्यानंतर चार तासात ती संपवावीच लागणार आहे त्यानंतर त्याचा वापर केला जाणार नाही.
दि. 16 जानेवारी 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 04 तर ग्रामीण भागातून 03 रुग्ण असे मिळून 07 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 97 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 06 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यात 02 रूग्ण पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. 10 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला नाही.
शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 07 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 6 हजार 070 रुग्ण असून, बरे झालेले 5 हजार 770 आहे तर मृत्यू झालेले एकशे एक्केचाळीस आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 09 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 01 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
चीन मधील तियानजिन शहरात आईस्क्रीमध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आईस्क्रीममध्ये विषाणू सापडला असल्याचे तज्ञांचे मत आहे. कारखान्यात स्वच्छतेची खबरदारी घेतली नसल्याचाही अंदाज आहे.