बारामती 16 कोरोना बाधित : जगात रेकॉर्ड ब्रेक नोंद

वतन की लकीर (ऑनलाईन): जगभरात कोरोना बाधित झालेल्या रूग्णांची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली असुन मृत्यू झालेल्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. 9 कोटीचा टप्पा ओलांडला आहे.

बारामतीत दि. 09 जानेवारी 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 10 तर ग्रामीण भागातून 06 रुग्ण असे मिळून 16 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.

काल 118 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 10 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. एकही रुग्ण प्रतिक्षेत नसून, इतर तालुक्यातही एकही पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले नाहीत. 30 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 03 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.

शहरातील काल दिवसभरात बारामतीत एकूण 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 5 हजार 967 रुग्ण असून, बरे झालेले 5 हजार 625 आहे तर मृत्यू झालेले एकशे चाळीस आहेत.

काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर 18 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 03 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरीकांनी सतत मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टेसिंग, गर्दीत जाणे टाळणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!