बारामती(वार्ताहर): वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्यावतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.12 डिसेंबर 2020 रोजी दु.12 वा. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे पश्र्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख राजेंद्र भिलारे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
कै.धों.आ.सातव महाविद्यालय, जुना मोरगाव रोड, बारामती याठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त शिवसैनिक व पवार साहेब प्रेमींनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी व रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना बारामती तालुका महिला आघाडी संघटक सौ.कल्पना जाधव (काटकर) यांनी केले आहे.
रक्तदात्यांनी आकाश सोनार (9527808811), सचिन झुंज (8600700461), ऋषि जाधव (8483823743), निलेश कसबे (7028006066), दादासोा दराडे (8805004424), देवेंद्र बनकर (9657224440) यांच्याशी संपर्क साधावा.