आज कामगारांचा संप

राष्ट्रीय कामगार संघटनांनी आज 26 नोव्हेंबर 2020 रोजी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यामध्ये तब्बल 25 कोटी कामगारही सामील होणार असल्याचा दावा कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन कॉंग्रेस (इंटक), ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (एटक), हिंद मजदूर सभा (एचएमएस), सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर (एआययूटीयूसी), ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटर (टीयूसीसी), सेल्फ-एम्प्लॉइड वुमेन्स एसोसिएशन (सेवा), ऑल इंडिया सेंट्रल काउंसिल ऑफ ट्रेड युनियन्स (एआयसीसीटीयू), लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन (एलपीएफ) आणि युनाइटेड ट्रेड युनियन कॉंग्रेस (यूटीयूसी) यांच्या संयुक्त फोरमनं याबाबत माहिती दिल्यानुसार संप होत आहे.

26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप केला जाणार असून त्याची तयारीही सुरू आहे. 25 कोटींपेक्षा अधिक कर्मचारी यामध्ये सहभागी होतील अशी आम्हाला अपेक्ष आहे, असं यावेळी सांगण्यात आलं. तर दुसरी भारतीय मजदूर संघ (बीएमएस) या संपात सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय मजदूर संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटना 26 नोव्हेंबर रोजी होणार्‍या संपात सहभागी होणार नसल्याचं बीएमएसनं स्पष्ट केलं आहे. भारतीय मजदूर संघाव्यतिरिक्त 10 राष्ट्रीय कामगार संघटनांनी मात्र देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

लोकसभेच्या पार पडलेल्या अधिवेशनात तीन नवीन कामगार कायदे मंजूर करण्यात आले आहेत आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेच्या नावाखाली 27 विद्यमान कायदे रद्द करण्यात आले. हे कायदे पूर्णपणे कॉर्पोरेट जगताच्या हिताचे आहेत. या प्रक्रियेमध्ये 75 टक्के कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेतून वगळण्यात आलं आहे, असं एआयबीईएनं मंगळवारी म्हटलं.

नव्या कायद्यानुसार श्रमिकांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळणार नाही. एआयबीईए स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक सोडून जास्तीत जास्त बँकांचं प्रतिनिधीत्व करते. सार्वजनिक आणि खासदी क्षेत्रातील बँका तसंच परदेशी बंकांचे मिळून चार लाख कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. महाराष्ट्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, ग्रामीण बँका आणि परदेशी बँकांचे 30 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.

तसंच आज 26 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचारी आपल्या मागण्याही मांडतील. यामध्ये खासगीकरणाचा विरोध, आऊटसोर्सिंग आणि कॉंन्ट्रॅक्ट सिस्टमचा विकोध, नियुक्त्या करणं, मोठ्या कॉर्पोरेट डिफॉल्टर्सविरोधात कठोर कारवाई, व्याज दरात वाढ, सेवा शुल्कात कपात अशा अनेक मागण्यांचा यात समावेश असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

डब्ल्यूसी मध्ये किमान वेतन, वेतन देणे, बोनस आणि समान मोबदला या चार कायदे एकत्र व दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ओएचएससी मध्ये हेच फॅक्टरी कायदा, कंत्राटी कामगार कायदा, आंतरराज्यीय स्थलांतर मजूर कायदा आणि बिडी कामगार, चित्रपट कामगार, बांधकाम मजूर, गोदी कामगार, मळे कामगार आणि मोटर वाहतूक कामगार, सेल्स प्रमोशन कर्मचारी आणि कार्यरत पत्रकार यांच्याबद्दलचे विशेष कायदे यांच्यासह एकूण 13 कायद्यांबाबत केले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने वेतन संहिता (डब्ल्यूसी) आणि व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा आणि कार्यस्थिती संहिता (ओएचएससी) अशा दोन विधेयकांसाठीचे ठराव लोकसभेमध्ये मांडलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!