बारामती(वार्ताहर): दि. 31 ऑक्टोबर रोजी दिवसभरात बारामती शहरातून 19 तर ग्रामीण भागातून 05 रुग्ण असे मिळून 24 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.
काल 82 जणांचे rt-pcr नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 07 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत तर एकही रुग्ण प्रतिक्षेत नसुन इतर तालुक्यात 06 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आला आहे. 51 रुग्णांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत. काल दिवसभरात बारामतीत एकूण 24 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी कळवले आहे. बारामतीत 4 हजार 210 रुग्ण असून, बरे झालेले 3 हजार 940 आहे तर मृत्यू झालेले एकशे चौदा आहेत.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत rt-pcr 13 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.
सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की सध्या कोरोना रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी सुद्धा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढत आहे तरी सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसींग पाळावे तसेच दुकानदारांनी सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व आपले शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती