यादगार सिटीत, मदरसा असल्याची वक्फ बोर्डात नोंद प्रत्येक्षात मात्र मशिद!

पदाचा गैरवापर केल्याबद्दल नगरसेविका बेबीमरियम बागवान यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी!
बारामती(वार्ताहर): येथील इंदापूर रोड लगत असणार्‍या यादगार सिटीत, मदरसा असल्याची नोंद वक्फ बोर्डला असताना, मात्र याठिकाणी चक्क मशिद सुरू आहे. या मदरसा नोंदीत नगरसेविका बेबीमरियम अजिज बागवान या वाकीफ (ट्रस्टी) आहेत. मदरसा असताना मशिद सुरू करून आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सोहेल शेख (बागवान) यांनी संबंधित विविध कार्यालयात दिली आहे. केली आहे.

याबाबत तक्रारी अर्जात असे म्हटले आहे की, मदरसा महेबुब-ए-जन्नत हा यादगार सिटी, इंदापूर रोड (ता.बारामती, जि.पुणे) येथे असुन तो औरंगाबाद वक्फ बोर्ड येथे नोंदणीकृत आहे. या मदरसाच्या विद्यमान नगरसेविका बेबीमरियम अजिज बागवान या वाकीफ आहेत. याठिकाणी मदरसा चालू असलेबाबत कोणतेही कागदोपत्री पुरावे नाहीत. प्रत्येक्षात मशिद या कारणासाठी वापर केला जात आहे. जर मदरसा सुरू असेल तर मदरसामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक विशेषत: राष्ट्रीय सण साजरे केले असल्याचे पुरावे असणे आवश्यक आहे.

सदरील ठिकाणी मशिद चालू असल्याचे नगरपरिषदेला माहित असूनही त्याठिकाणी नगरसेवक बेबीमरियम बागवान यांचे दबावाखातर कोणीही चौकशी करण्यास गेले नाही. संबंधित क्षेत्रिय अधिकार्‍यांनी वरिष्ठांना कळविले नाही. म्हणजे त्यांनी नगरसेवक पदाचा गैरवापर केला आहे. याबाबत सखोल चौकशी होवून नगरसेविका बेबीमरियम बागवान यांनी पदाचा गैरवापर केला असल्यास त्यांचे नगरसेवक रद्दबातल करण्यात यावे असेही अर्जात नमूद केले आहे.

मदरसा दारूल ऊलूम मौलाना युनूसीयामध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नुकत्याच उच्च न्यायालयाच्या नोटीसा लागलेल्या असताना, पुन्हा मदरसा भासवून त्याठिकाणी मशिद सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!