पाहुणेवाडीत कृषिदूतांकडून वृक्षारोपण: विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभवामुळे वास्तव्य

बारामती(प्रतिनिधी): महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ॲग्रीकलचरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय शारदानगरचे चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी पाहुणेवाडी येथे वास्तव्य करत आहेत. पाहुणेवाडी येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून पाच जून पर्यावरण दिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पर्यावरण दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायतराज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते पहिले शेतकरी मुख्यमंत्री होते असे यावेळी कृषीदूतांनी सांगितले.

यावेळी पाहुणेवाडी गावचे ग्रामसेवक सुजाता आगवणे, प्रशासक भगवानराव तावरे, प्रशासक समिती सदस्य राधिका भंडलकर, सहाय्यक राकेश गोळे, शेतकरी महेश कोडे, अभिषेक तावरे, अजित तावरे, विराज तावरे, अभिजीत तावरे, कैलास तावरे, नामदेव दावले यांनी प्रतिसाद दिला.

कृषीदूत कुणाल पडोळ, कुमार पडोळ, पार्थ सरडे, रोशन शिंदे, संकेत बसते, चैतन्य बोडके, दादासाहेब सावंत, आदींनी वृक्षरोपण करीत गावाकऱ्यांना पर्यवरणाचे महत्व पटवून दिले.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.निलेश नलावडे, प्रा.जया तिवारी, कार्यक्रम समन्वयक प्रा.निळकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. मयूर पिसाळ, डॉ.पल्लवी देवकाते, प्रा.शिवानी कोकरे देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!