राजकारणात कित्येक वेळा स्थित्यंतर आली, मात्र शेवटपर्यंत मुंडे कुटुंबियांशी एकनिष्ठ असणारे, बारामतीचे आलताफभाई बागवान!

बारामती(प्रतिनिधी): देशात व राज्यात कित्येक वेळा राजकारणात स्थित्यंतर आली, मात्र शेवटपर्यंत मुंडे कुटुंबियांशी 1985 पासून एकनिष्ठ असणारे बारामतीचे आलताफ इमामहुसेन बागवान आहेत.

मुंडे कुटुंबात कोणतीही आनंदाची बातमी घडल्यास बारामती शहरातील गांधी चौकात फ्लेक्स लागले नाही, फटाके वाजले नाही किंवा पेढे वाटप झाले नाही असे कधीही होणार नाही. एवढं स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या राजकारणापासून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आलताफ बागवान आहेत.

ज्यादिवशी गोपीनाथ मुंडे यांची दु:खद घटना समजली तो दिवस त्यापुढील कित्येक दिवस आलताफभाईना दु:ख, वेदना असह्य झाल्या होत्या. या देशाचे कधीही भरून न येणारे असे नुकसान झाले होते. आलताफ भाईंनी त्यांचे नावाने पाणपोई सुरू केली. आजतगायत या पाणपोईचा लाभ नागरिक घेताना दिसतात. कोरोना काळात अन्नदान, धान्य वाटप केले. साहेबांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त गरजुंना फळे वाटप, ब्लॅकेट वाटप तर काहींना आर्थिक मदत सुद्धा केली व करीत आहेत.

आघाडी सरकारची सत्ता असताना आलताफभाई करीत असलेल्या प्रत्येक कृतीवर समोरची मंडळी हसत होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत एकनिष्ठेने कृती करण्यामध्ये ते कधीही मागे राहिले नाही. आजमितीस उलट जे हसत होते तेच आलताफभाईंना नमस्कार घातल्याशिवाय पुढे जात नाही हे पहावयास मिळते.

स्व.गोपीनाथ मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांचेवर प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणजे निष्ठावान आणि समर्पित लोकांचा मोठा गट आहे. मुंडे कुटुंबियांची राजकीय विचारसरणी, विकासनिष्ठ धोरणे आणि लोकांसाठी केलेल्या कार्यावर पूर्ण विश्र्वास ठेवून आजही आलताफभाईंसारखे कार्यकर्ते ठामपणे न डगमगता काम करीत आहेत. आज केंद्रात व राज्यात भाजपाची सरकार आहे. मुंडे साहेबांच्या काळात, पवारांच्या बालेकिल्ला बारामतीत विरोधी भूमिका बजाविणे म्हणजे वाघाचे काळीज लागत होते. ती भूमिका चोखपणे आलताफभाईंनी बजावली ही विशेष बाब आहे. आज आघाडीची बिघाडी करीत काही डरकाळी फोडणारे भाजप बरोबर गेले आहेत आता कोणीही विरोध करेल.

जनसामान्यांशी जोडलेली व्यक्ती म्हणजे मुंडे साहेबांचे व्यक्तिमत्व होते. या व्यक्तिमत्वाच्या सावलीत वाढलेले बारामतीचे आलताफभाई आहेत. मुंडे साहेबांनी जनतेच्या प्रश्र्नांना आवाज उठविला. शेतकरी, कामगार, महिला आणि गोर-गरीब वर्गासाठी त्यांनी लढा देवून ग्रामीण विकासावर विशेष भर दिला होता.

स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. याच कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीसाठी मोठे योगदान दिले. मुंडे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजाताई काम करीत आहेत. पंकजाताईंनी महिला सबलीकरणाला चालना दिली, महिलांचे प्रश्र्नांवर विशेष भर दिला. आलताफभाईंसारख्या कार्यकर्त्यांनी गावोगावी फिरून मुंडेंचे विचार आणि ध्येय पोहोचवण्याचा मनोमन प्रयत्न केला. पंकजाताईंची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेनंतर आलताफभाईंनी स्वत:च्या घराच्या बाहेर शुभेच्छांचा फलक लावून मुंडे कुटुंबियांवर असणार्‍या प्रेमाला आणखीन उजाळा दिला.

आजही कार्यकर्ते जन्मतिथी, पुण्यतिथीवर कार्यकर्ते विविध उपक्रम राबवून श्रद्धांजली अर्पण करतात ही खूप मोठी बाब आहे. मुंंडे कुटुंबाच्या जनधाराचा पाया म्हणजे आलताफभाईंसारखे निष्ठावान कार्यकर्तेच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!