बारामती: बारामती नगर परिषदेत रोजंदारीवर काम करणार्या सफाई कर्मचार्यांसाठी सन 1985 मधील लाड समितीच्या शिफारशीस नुसार वारस हक्काने नोकरी मिळण्यासाठी सफाई कर्मचार्यांच्या वतीने चालू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला त्यांच्या मागण्यांबाबत शासनाने योग्य विचारणा केल्यास वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात, तालुकाध्यक्ष अनुप मोरे, विनय दामोदर, आनंद जाधव, संघटक कार्तिक भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती नगर परिषदेत सन 1985 सालापासून ते सर्वजण सफाई कामगार म्हणून सेवेत आहेत. त्यांना आयुक्त व प्रादेशिक संचालक नगर परिषद यांच्या आदेशानुसार कायम करण्यात आले होते. मात्र सन 2005 पासून सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीचा दुहेरी फायदा घेता येणार नाही, असे नमुद करून त्यांचा प्रस्ताव नाकारण्यात आले होता. तथापि 24 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयाने कलम मधील तरतुदीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची तरतुद पुन्हा केली आहे. या तरतुदीनुसार त्यांच्या वारसांना नोकरी मिळण्याचा हक्क मिळाला आहे.