सरकारला धनगर समाजाची गरज नाही, आतापर्यंत किती कॅबिनेट झाल्या – सौ.अनिता खरात

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): सन 2014 साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार येऊ द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा प्रश्र्न मार्गी लावला जाईल. मात्र त्यानंतर किती कॅबिनेट झाल्या तरीही आजपर्यंत आरक्षण दिले नाही. यावरून असे वाटते की, सरकारला धनगर समाजाची गरज नाही असे परखड मत तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अनिता खरात यांनी उपोषणकर्त्यांसमोर मांडले.

पंढरपूर येथे धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण चालू आहे. याठिकाणी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी सौ.खरात उपस्थित होत्या त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.

सौ.खरात पुढे म्हणाल्या की, धनगर समाज बांधवांनी आरक्षणासंदर्भात गेली 15 दिवसापासुन धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी आरक्षण देण्यासंदर्भात आव्हान दिले, चर्चा केली. याबाबत शासनाने कोणतीही दखल घेतली नाही.

दि.9 सप्टेंबर 2024 पासून पंढरपुर येथे विठ्ठलाच्या चरणी विठुरायाच्या भूमीत उपोषण करत आहेत याचा विचार शासन करणार आहे का नाही असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. धनगर समाजाला 2014 पासून फक्त आश्र्वासन मिळालेले आहे. सन 2014 पासून कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झालीच नाही का? असा संतप्त सवाल समाजाला पडलेला आहे. शासनाला धनगर समाज हक्काचे आरक्षण मागत आहे आणि याचा विचार जर सरकार करणार नसेल तर समाजातील लेकींना काठी आणि कुराड घ्यायला भाग पाडू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाला आरक्षण देऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण स्वत: राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी येऊन सोडवावे. समाज आरक्षणाच्या मुद्दयाने खूप मेटाकुटीस आलेला आहे. समाज आजही शांत व संयमाची भूमिका घेऊन सरकारशी समन्वय व संवाद साधुन सविनय मार्गाने हक्काचे आरक्षण मागीत आहे. ते देण्यासाठी एवढा काळ लोटत असेल तर समाजाला पेटून उठल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र त्यावेळी वेळ गेलेली असेल असेही त्या यावेळी म्हणाल्या.

यावेळी तेचपृथ्वी ग्रुपचे लक्ष्मण वाघमोडे, सद्दाम बागवान, पांडूरंग शिंगटे, समाधान येमगर, तानाजी कर्गळ, ओंकार शेंडगे, संदीप रेडके, नारायण हरणवळ, गणेश शिंगाडे, सुधीर पाडूळे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!