आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर आपले प्रभाव पाडणारे व्यक्तीमत्व सर्वांसमोर आणणे महत्वाचे असते. दैनंदिन जीवनात वर्तनातून, इतरांशी केलेल्या व्यवहारातून व आपल्या प्रत्येक हालचालीतून माणुसकीचे प्रदर्शनही होत असते. असे शांत, संयमी मात्र कणखर व्यक्तीमत्व बारामतीचे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू देशमुख होय.
हिरा जेवढा जास्त सुबक व चमकदार दिसतो तेवढे त्याच्यावर आघात झालेले असतात. तसेच सोन्याला लालबुंद भट्टीत तापविल्याशिवाय त्यास झळाळी येत नाही. त्याचप्रमाणे समाजात बबलू प्रभावी व्यक्तीमत्व बनविण्यासाठी त्यामागे वडिल माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोककाका देशमुख व आई तसेच देशमुख कुटुंबियांनी ठासून भरलेल्या संस्काराने घडलेले आहेत.
देशमुख कुटुंबियांनी स्वत:ची अद्वीतीय ओळख निर्माण करून स्वत:साठी स्वत:च राजमार्ग निर्माण करून स्वाभिमानाने व आत्मविश्वासाने मार्गक्रमण करत राहिल्याने त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव आपोआपच इतरांवर पडल्याशिवाय राहत नाही. या कुटुंबियांचे मनात कोणाविषयी राग द्वेष नसल्याने आपले स्वनिर्मीत व तेजोमय व्यक्तीमत्व घडत गेलेले आहे हे आपण बारामतीतून पहात आलेलो आहोत.
आपली शरिरयष्टी, आपले दिसणे, आपला पेहराव आपला पेशा तसेच आपली भौतिक श्रीमंती आपल्या व्यक्तीमत्वाला प्रभावी बनवीण्यास कारणीभूत आहे असा कित्येकांचा समज असतो. यामुळे समाजात आपला रुतबा, मान सन्मान वाढतो असे काहींना मनोमन वाटत असते. परंतू हा केवळ समज आहे. ह्या सर्वांच्या जोडीला दयेने व करुणेने भरलेले मन, उत्तम विचार जे सर्वांच्या कल्याणास पात्र असतील तसेच विचारांना प्रत्यक्षपणे अस्तित्वात आणणारे अंगी असलेले सामर्थ्य आपले प्रभावशाली व्यक्तीमत्व उभारण्यास आवश्यक असतात. तेच अशोककाका देशमुख यांनी समाजात पेरले आहे आणि आज बबलूच्या रूपात सर्वांना दिसत आहे.
बारामतीत सार्वजनिकरीत्या मंडळांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करणारे बबलू देशमुख आहेत. एका जयंतीच्या वर्गणी पावती बघण्याचा योग मला मिळाला होता. जसं की, नोटांचा बंडल ठेवला आहे की काय? अशा वर्गणीच्या पावत्या होत्या. कोणालाही नाराज न करता वर्गणी दिली जाते ही खुप विशेष बाब आहे. ज्या हाताने मदत केली ती मदत दुसर्या हाताला कळू देत नाही हे महत्वाचे आहे. बारामतीत स्व.धनंजय(भाऊ) देशमुख मेमोरीयल ट्रस्टच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरू आहे. दरवर्षी फुलांचे गुच्छ दुसर्या दिवशी ट्रॅक्टर भरभरून वाया जात असल्याचे लक्षात आलेनंतर त्यांनी गेल्या काही वर्षापासुन कृपया येताना केक, हार, गुच्छ व भेटवस्तू आणू नये, शालेय वह्यांच्या स्वरूपात भेटवस्तु स्विकारल्या जातील यामुळे गरजु विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल हा उद्देश त्यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे ही खूप मोठी उल्लेखनिय बाब आहे.
दरवर्षी दहिहंडी उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बारामतीसह इतर तालुक्यातील गोपाळभक्त दहिहंडीचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.
स्वतंत्र होण्याचं धाडस करा, तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचे धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल. या स्वामी विवेकानंदांच्या विचारावर देशमुख कुटुंब काम करीत आहे व पुढची पिढीही करीत राहील यात शंका नाही.
अशा शांत, संयमी मात्र कणखर व्यक्तीमत्व असणार्या जयसिंग उर्फ बबलू देशमुख यांना वाढदिवसाच्या लाख..लाख..शुभेच्छा!
तैनुर शेख, संपादक सा.वतन की लकीर