कितीही दुष्काळ पडला तरी पाणी पुरेल : 40 दिवस पाणी पुरेल एवढा साठा

बारामती(वार्ताहर): कितीही दुष्काळ पडला तरी बारामतीकरांना किमान 40 दिवस पाणी पुरेल एवढा साठा असलेला साठवण तलाव उभारलेला आहे. असे नागरीकांना सांगण्यात आले होते. आणखीन एक साठवण तलावाचे काम सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्र्न उद्भवणार नाही असेही सांगण्यात आले होते.

निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याची बातमी सोशल मिडीयावर एवढी प्रसारीत झाली की, आता पाण्याचा खुप मोठा प्रश्र्न निर्माण होणार की काय असे नागरीकांना वाटू लागले.

गुरुवार दि.30 मे 2024 रोजी संपूर्ण बारामती शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवठा होईल व दि.31 मे 2024 रोजी पाणीपुरवठा होणार नाही अशाप्रकारे निरा डावा कालव्याचे पुढील आवर्तन मिळेपर्यत एक दिवसाआड पाणी पुरवठा होईल याची सर्व नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी व नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करोडो रूपये खर्च करून साठवण तलाव बांधण्यात आले आहे. 40 दिवस पुरेल एवढा पाणी साठा यामध्ये होईल जर एक दिवसाआड पाणी सोडले तर 80 दिवस पाणीपुरवठा होईल.

ज्या भागात निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे त्या लगत असणारे बोअरवेल, विहीरी कोरड्या पडलेल्या आहेत. त्या ठिकाणच्या नागरीकांना नगरपालिकेच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शेवटी विकास आहे करावाच लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!