इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): आमदार भरणे यांच्या अथक प्रयत्नातून इंदापूर तालुक्याचा विकास झाला व या विकासातून नागरीकांची मने जोडली गेली आता तर चक्क पश्र्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडण्याचे काम आमदार दत्तात्रय भरणे यांनी केल्याचे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिरसोडी कुगाव पुलाद्वारे मराठवाडा -पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार.. शिरसोडी कुगाव पुलाद्वारे पुणे सोलापूर जिल्हा जोडला जाणारा असून दळणवळण गतिमान व सुलभ होणार आहे. या पुलाचे तब्बल 385 कोटीची निविदा निघाली आहे. या कामामुळे आमदारांचे नाव इंदापूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले जाणार आहे.
इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते कुगाव (ता.करमाळा) उजनी जलाशयावर लांब पुलाचे आज टेंडर निघाले आहे. तब्बल 382 कोटींचा हा पूल असून इंदापूर शहरातील व्यापारी व जनतेच्या मागणीला आमदार भरणे यांच्या प्रयत्नातून हे यश आहे, महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण की सर्वात कमी वेळात एवढं मोठं काम आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंजूर करून घेतले आहे.
राष्ट्रीय महामार्ग 65 वरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. अहमदनगर जिल्ह्यातील वाहतूक टेंभुर्णीमार्गे केली जाते परंतु हा जर पुल झाला तर बरीचशी वाहतूक याच पुलावरून होण्याची शक्यता असेल.परंतु हा पूल एका राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर उभारणे आवश्यक आहे. कारण येथून खूप मोठे दळणवळण होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार भरणे यांनी मांडलेल्या विषयाला अनुमती देऊन चालू वर्षात हा पूल बांधण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. अवघ्या एक महिन्यात सर्व पूर्तता करून या पुलाचे आज टेंडर निघाले आहे..
मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा हा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असेल. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यातील तब्बल 100 कि.मी.कमी होईल.यामुळे इंदापूर शहराची उलाढाल पाचपट वाढणार आहे. करमाळा व इतर भागातील उसाला पश्चिम भागात मोठी बाजारपेठ निर्माण होईल. त्यामुळे शेतकर्याचा आर्थिक विकास होईल. उजनी बॅकवॉटर टुरिझम ट्रँगल परिसर(इंदापूर भिगवण करमाळा) विकसित होईल. या पुलामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटा सुकर होऊन जातील , आरोग्याच्या सोयी ग्रामीण भागातील लोकांना सहजतेने उपलब्ध होतील. मासेमारी करणार्या बांधवांना इंदापूर व भिगवण मस्त्य बाजारपेठ काबीज करता येईल.करमाळा तालुक्यातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे आमदार भरणे यांचा जाहीर सत्कार लवकरच करण्यात येईल अशी भावना इंदापूर येथील व्यापार्यांनी बोलावून दाखविली आहे.