इंदापूर (प्रतिनिधी अशोक घोडके): इंदापूरचे कार्यसम्राट आमदार दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या अथक प्रयत्नातून ग्रामपंचायत कळंब अंतर्गत मंजूर झालेल्या 102 कोटी 70 लाख रूपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा समारंभ रविवार दि.10 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता आ.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर मा.जि.प.सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, श्री छत्रपती कारखान्याचे व्हा.चेअरमन अमोल पाटील, जि.नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर मार्केट कमिटीचे सभापती दत्तात्रय फडतरे, इंदापूर पं.स.सदस्य सुहास डोंबाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, वालचंद विद्यालय कळंबचे चेअरमन रामभाऊ कदम, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष इकबाल शेख इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे ग्रामपंचायत कळंबचे सरपंच सौ. विद्याताई सावंत व उपसरपंच लक्ष्मण पालवे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
सर्वांना पत्रिका पाठविल्या आहेतच मात्र, नजर चुकीने कोणाला पत्रिका न मिळाल्यास हे निमंत्रण समजून कार्यक्रमास आग्रहाने उपस्थित रहावे असेही आवाहन ग्रामपंचायत कळंबच्या वतीने करण्यात आले आहे.