बारामतीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न
बारामती(वार्ताहर): महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी अडीच कोटी रूपये वितरतीत करून फक्त 750 रूग्णांना लाभ मिळाला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून 18 महिन्यात 194 कोटी, नागपूर 19 कोटी असे 213 कोटी वितरीत करून 26 हजार रूग्णांचे प्राण वाचले आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यात झाला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री सहाय्यक निधीचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी केले.
रचना मार्केट, स्टेशन रोड याठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.चिवटे बोलत होते. याप्रसंगी ऍड.जी.बी. (आण्णा) गावडे, शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष वस्ताद पप्पू माने, पुणे जिल्हा समन्वय सतिश गावडे, ऍड.गोविंद देवकाते इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.चिवटे म्हणाले की, गोर-गरीब रूग्णांसाठी निष्ठाभाव असेल तर या पंचक्रोशितील एकही रूग्ण रूग्णसेवेपासून वंचित राहणार नाही. पक्षीय कार्यापेक्षा रूग्णसेवेचे ईश्र्वर सेवेचे कार्य आहे. इतर ममत्व भाव न बाळगता काम करीत आहोत. येणार्या काळात हे वैद्यकीय मदत कक्षाचे कार्यालय आरोग्य मंदिर म्हणून ओळखले जाईल. यापुर्वी बारामतीच्या एका कार्यक्रमात अजितदादांच्या उपस्थितीत मी सांगितले होते की, नेतृत्व जेव्हा एखाद्या संवेदशिल माणसाकडे येते त्याचप्रमाणे प्रशासन सुद्धा संवेदनशिल काम करू शकते याचे मुर्तीमंद उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वैद्यकीय मदत कक्ष होय. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर वैद्यकीय मदत कक्षाला संजीवनी दिली. वैद्यकीय मदत कक्ष हे एक विद्यापीठ आहे या माध्यमातून रूग्णसेवक घडत आहे. प्रत्येक पक्षाने आपआपल्या वैद्यकीय कक्ष स्थापन केले पाहिजे असे मी प्रत्येक वेळी सांगत आलो आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या म्हणण्यानुसार वर्षा बंगला असेल किंवा मंत्रालयात मदतीवाचून एकही रूग्ण रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. त्याला मुख्यमंत्री सहाय्य, धर्मादाय, महात्मा फुले इ. सारख्या कोणत्या ना कोणत्या योजनेतून मदत झाली पाहिजे. मदत कक्ष अहो रात्र काम करीत आहे. शनिवार, रविवार देखील काम सुरू असते. पत्रकारांना सुद्धा मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुर्वी मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय मदत कक्षात 6 हजार आजारांवर अर्थसहाय्य मिळत होते. आता 20 ते 21 हजार आजारांवर अर्थ सहाय्यक मिळत आहे. टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. सर्व ऑनलाईन भरायचे आणि ईमेल केला वैद्यकीय पथक कागदपत्रांची पुर्तता करून तात्काळ मंजूरी देवून एका आठवड्यात लाभार्थ्यांना पैसे मिळालेच पाहिजे असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याचे म्हणणे आहे. ही सर्व पारदर्शक प्रक्रीया आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या गुरूला गुरूवंदना देण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने दवाखाना सुरू केला आहे. यामध्ये हृदयासंदर्भात निशुल्क, रूग्ण व सोबत असणार्याला राहण्याची सोय करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात गंगूबाई संभाजी शिंदे आईच्या नावाने मोफत रूग्णालय सुरू केले आहे. या रूग्णालयात 1200 शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात याचा सुद्धा लाभ नागरीकांनी घ्यावा असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
फटाक्याच्या अतिषबाजीत मंगेश चिवटे यांचे स्वागत करण्यात आले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वय सतिश गावडे यांनी केले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष हनुमंत देवकाते, रूग्णसेवक निलेश गजरमल, इंदापूरच्या सीमा कल्याणकर, धनाजी गावडे पाटील ऍड.महेश गावडे डॉ.बाळासाहेब आटोळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महिला आघाडीच्या सौ सुनीता डोंबाळे, सोनू माकर, मेडद गावचे सरपंच संतोष गावडे पाटील, पै.निलेश जगदाळे, बीजेपीचे युवा सेना अध्यक्ष संदीप केसकर इ.उपस्थित होते. तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.