बारामती(वार्ताहर): 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन व जागतिक थॅलेसोमिया दिन या निमित्त येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ रक्त पेढी बारामती यांच्या वतीने रक्तपेढीमध्ये थॅलेसोमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांच्या पालकांसाठी मार्गदर्शन पर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चर्चेत सहभाग घेतला यावेळी थॅलेसोमिया आजारा विषयी माहिती इंडियन रेड क्रॉस सोसायटी बारामतीचे सचिव डॉ अशोक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील बालरोग तज्ञ डॉ. बी. के सिसोदिया यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ सिसोदिया यांनी थॅलेसोमिया आजारा विषयी सखोल माहिती दिली शिवाय रुग्णांच्या समस्या, पालकांना येणार्या अडचणी यावर चर्चा केली. यावेळी थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त रुग्णांचे पालक तसेच ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.