कोरोना रूग्णाचे अंतिमसंस्कार विधी करण्यासाठी लोणावळा सुन्नी मुस्लीम जमात पुढे..

बारामती(वार्ताहर): भारतावर वेळोवेळी येणार्‍या संकटात भारतातील मुस्लीम समाजाचे खुप मोठे योगदान आहे. त्याच माध्यमातून लोणावळा नगरपरिषद व लोणावळा येथील सुन्नी मुस्लीम जमात यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोनाचा विषाणूच्या संसर्गाने मृत पावलेल्या पिडीत व्यक्तींचा अंतिम संस्कार विधी चे पवित्र काम ते ही विनामोबदला करण्यासाठी सुन्नी मुस्लीम जमात पुढे आले आहे.


यामध्ये सुन्नी मुस्लीम जमातीचे विश्र्वस्त हाजी ईसाक पटेल, चेअरमन शफी इसाक आतार, व्हा.चेअरमन रफिक हुसेन शेख, सल्लागार फरहान हनिफ शेख यांच्यासह अन्वर रफिक शेख, जावेद गणी शेख, हाजी खालील नोहीद्दीन शेख, इमरान (सोनू) हनिफ तांबोळी, असीफ वारीस खान व खालीद अजिज शेख या कोरोना योद्धे जे पवित्र काम करीत त्याचे कौतुक संपूर्ण मावळ, लोणावळा परिसरात विशेषत: बारामतीमध्ये केले जात आहे.

बहुसंख्य मुस्लिमेतर बांधवांसमवेत मुस्लिम समाजही, हा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबद्ध आहे. गेल्या 70 वर्षात मुस्लिम समाजासंबंधित अनेक समज-गैरसमज पसरविले गेले आहेत. मात्र मुस्लीम समाज त्याकडे दुर्लक्ष करीत इमाने, इतबारे काम करून आपल्या भारत देशाशी एकनिष्ठ राहिलेला आहे. इचलकरंजीत कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता (आय.सी.यु.) विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान असेल किंवा लॉकडाऊन काळात दिलेला मदतीचा हात असेल हे सर्व वाखण्याजोगे आहे. त्यामध्ये अंतिम संस्कार विधी चे पवित्र काम ते ही विनामोबदला करण्यासाठी मुस्लीम समाज पुढे आला आहे.

3 thoughts on “कोरोना रूग्णाचे अंतिमसंस्कार विधी करण्यासाठी लोणावळा सुन्नी मुस्लीम जमात पुढे..

  1. Gr8 work done by farhan hanif shaikh sahab and Sunni Muslim Jamat lonavla IN-SHAA-ALLAH ALLAH will surely reward you all for this great deed…I pray & hope that this act will spread love between all the communities in our Country…AAMEEN

  2. ????अल्लाह आप के जैसी हम साब को भी ये सआदत हासिल करे .???
    AMEEN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!