जनता कर्फ्यू चे जनतेकडून उल्लंघन: मॉर्निग व इव्हिनिंग वॉक सुरु!

बारामती(वार्ताहर) : बारामती शहर व तालुक्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जनतेने जनतेसाठी 14 दिवसांचा जनता कर्फ्यू लागु केला आहे. मात्र सात दिवसाच्या आतच मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करुन लावलेले निर्बंध तोडण्यात आलेले दिसत आहे.

जनता कर्फ्यू मध्ये लागु केलेल्या निर्बंधाच्या अटी व शर्ती मधील अ.क्र 4 चे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे अ.क्र. 7 चेही उल्लंघन होताना दिसत आहे. आज संपुर्ण प्रशासन रात्रीचा दिवस करुन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झटत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा सर्व यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहे. मात्र काही जनता जनतेसाठी पुकारलेल्या कर्फ्यू चे उल्लंघन करीत असतील तर याला काय म्हणायचे. आज बारामतीच्या पोलीसांची अवस्था पाहता पोलीस संख्या नगण्य काम मात्र चोपटीने त्यामुळे त्यांची मानसिकता काय असेल. अ.क्र.7 मध्ये भाजी, मंडई, फेरीवाले यांना बंदी असताना चौकाचौकात भाजी विक्री होताना दिसली. काही युवक तर गल्ली बोळातून रस्ते काढीत जसं की याला कोविड सेंटरला जाऊन रुग्णाचा उपचार करायचा की काय अशा पद्धतीने वाहन हाकताना होते. सात दिवस होण्यापुर्वी ही अवस्था असेल तर 14 दिवस काय होईल. याबाबत प्रशासनाने अशांवर जागीच कार्यवाही करुन समज द्यावी. म्हणजे त्याना कळेल जनतेच्या हितासाठी पुकारलेला कर्फ्यू कशाला म्हणतात.

One thought on “जनता कर्फ्यू चे जनतेकडून उल्लंघन: मॉर्निग व इव्हिनिंग वॉक सुरु!

  1. पोलिसांनी लोक बाहेर पडले की ठोकावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!