जनता कर्फ्यु काळामध्ये बारामती शहर व ग्रामीण भागात रस्त्यावर विनाकारण फिरणारे ,मास्क न घालता फिरणारे तसेच मो.वाहन अधिनियम यांचे उल्लंघन करणारे लोकांवर पोलिसांनी 356 केसेस करून 73 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे.
तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती मार्फत पेन्सिल सर्कल, सिटी इन पॉइंट, सांगवी, माळेगाव या भागात प्रवासी/खाजगी वाहतुक-17 गुन्हे दाखल करून एकुण पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
बारामती पोलीस विभागाने जनता कर्फ्युच्या आता पर्यन्तच्या 3 दिवसाच्या कालावधीत 1367 केसेस करण्यात आल्या असून 2 लाख 96 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांनी 58 केसेस दाखल करून 1 लाख 76 हजार दंड वसूल करण्यात आला आहे.
अशा कारवाई करण्यात आल्या असून अधिक कारवाई करण्यात येणार आहे . नागरिकांनी घरी रहावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.