बारामती(वार्ताहर): गेली दोन वर्ष पाठीवर थाप टाकीत लढ म्हणणारे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांची बढतीवर नागपूर येथे उपमहानिरीक्षकपदी बदली झाली. पुणे जिल्ह्याची हद्द सोडताना शिरूर पोलीस स्टेशनकडून साहेबांना निरोप देताना पोलीस अधिकारी व कर्मचारी भावुक झाले होते.

वर्दीबाबत जो अभिमान असायला हवा तसाच तो स्वत:बद्दल दाखविणारे पाटील होते. त्यांनी मानसिकता, शारीरिक सदृढताबरोबर आपले कुटुंबीय, आपले शहर, राज्य, देश व व समाजाप्रती पोलीस कर्मचार्यांना आपुलकी जपली. कधीही भेदभाव न करता प्रत्येक नागरीकाला समान न्याय मिळून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पिळदार शरीर, मिश्या किंवा छाती असेल तरच गुन्हेगारांना धडकी भरते म्हणतात पण असे काहीही नसताना गुन्हेगारांना मोक्का आणि तडीपार लावून नाव घेता क्षणी गुन्हेगारांमध्ये धडकी भरल्याशिवाय राहत नाही असे संदीप पाटील आहेत.

नक्षलवादी भागात त्यांनी एक वेगळीच छाप निर्माण केली आहे. त्यांचा आजपर्यंतचा अनुभव या विभागासाठी खुप महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:हून याठिकाणी नियुक्ती मागितलेली आहे. यांना निरोप देताना भावुक झालेले अधिकारी व कर्मचार्यांना काय बोलावे कळेना. दोन वर्षात पाटील साहेबांकडून जे काही शिकायला मिळाले ते पुढील कर्तव्य बजाविताना मोलाचे असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खाणापुरे व उपस्थित कर्मचार्यांनी सांगितले.