बारामती(वार्ताहर): सध्या जागतिक कोरोना विषाणूच्या महामारीत जगात सर्व गोष्टी व्हर्च्युअल सुरू आहेत. त्यामुळे साप्ताहिक वतन की लकीर ने www.vatankilakir.com वेबसाईट आणि युट्युब चॅनेल सुरू केला आहे. आज दि.7 सप्टेंबर 2020 रोजी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांच्या शुभहस्ते या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. साप्ताहिक वतन की लकीर हे शासनमान्य यादीतील वृत्तपत्र आहे.
आधी आपल्याला बस तिकीट काढण्यासाठी बस स्टॅन्ड अथवा एजंटकडे जावे लागायचे. बँकेचे व्यवहार करण्यासाठी रांगेत तासंन तास उभे राहावे लागायचे, कुठलीही वस्तू खरेदीसाठी बाजारात जाणे आणि वेळ आणि पैसे खर्ची घालणे असं करावं लागायचं परंतु आता काळ बदलत चालला आहे आणि या सर्व गोष्टी आपल्या बोटाच्या एका क्लिक वर आल्या आहेत. हे सर्व आपण वेबसाईट आणि ऍपद्वारे करू शकतो. ही स्पर्धा प्रिंट मिडीया व इले.मिडीयामध्ये निर्माण झालेली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेबसाईट सुरू करण्याचा निर्णय घेतला तो आपल्या सर्वांच्या आशिवार्दामुळे पूर्ण झालेला आहे. यापुढे आपणाला कधीही, कुठेही सा.वतन की लकीर वृत्तपत्राच्या घडामोडीचा आनंद घेता येईल.