सर्व जग कोरोना विषाणूशी लढा देत आहे. प्रत्येकाला स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. यामध्ये आरोग्य, पोलीस व नगरपालिकेचे कर्मचारी निस्वार्थपणे लढा देत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून 24 तास सेवा देणार्या कोरोना योद्धांचा बारामतीचा नागरीक या नात्याने सर्वांना त्यांचा गर्व, अभिमान असलाच पाहिजे. तथागत गौतम बुद्धांनी सांगितले आहे की, ङ्कहजार योद्धांबरोबर जिंकणे सोपे आहे परंतु, जो स्वत:वर विजय मिळवतो तोच खरा विजय आहे.ङ्ख
आरोग्य खाते, पोलीस खाते यांच्या खांद्याला खांदा देत बारामती नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ देत आहे. बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, राजेंद्र सोनवण, अजय लालबिगे व विजय शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये अगनीशमनचे दक्ष कर्मचारी मोहन शिंदे, आरोग्य विभागाचे राजु पवार, निखिल शिलवंत, योगेश खंडाळे व राहुल सोनवणे हे 24 तास बारामती नगरपरिषदेच्या हद्दीत सापडणार्या रूग्णाच्या ठिकाणी निर्भिडपणे, जीवाची बाजी लावून सदरचा विभाग, परिसर, इमारत निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करीत आहेत. या कर्मचार्यांच्या कार्यामुळे परिसरातील नागरीकांना धीर येत आहे. मनामध्ये कोरानाची जी भिती घर करून बसली आहे ती दूर होत आहे. हे कर्मचारी 24 तास सतर्क असतात, निरोप मिळेपर्यंत तत्परतेने घटनेच्या ठिकाणी काही क्षणात हजर होतात. परिसर निर्जंतुकीकरून येथील नागरीकांना धीर देवून त्यांचे मनोबल वाढविण्याचे कामही करीत असतात.
मोहन शिंदे गेल्या सहा महिन्यांपासून या विषाणूच्या पुर्वी कुटुंबात ज्याप्रमाणे हसून खेळून राहत होते त्यापासून दूर झाले आहेत. इतर कर्मचारी दोन महिने झाले घरी गेले नाहीत. या कर्मचार्यांना सुद्धा भिती आहे, कुटुंब आहे, काळजी करणारे आई-वडिल, बायका मुलं-बाळं आहेत. मात्र बारामतीकरांच्या सेवेसाठी व आपल्या नोकरीशी इमाने-इतबारे काम करून अहोरात्र निस्सीम सेवा बजावीत आहेत. काही बिनबुडाची मंडळी सहज म्हणतात ते नगरपरिषदेचे कर्मचारी आहेत त्यांना पगार मिळतो. अशा बिनबुडाच्या मंडळींनी या कर्मचार्यांच्या जागी येऊन या कार्याची धुरा सांभाळावी, विषाणू आपल्या अंगी जडेल या भिती पोटी घराचा कोपरा धरणार्यांना काय कळणार.
या कर्मचार्यांना नगरपरिषदेतर्फे मास्क, ग्लोज, सॅनिटायझर, गमबूट, साबण, वाहन, इंधन इ. वेळेवर पुरवठा केला जातो. आमच्या कार्यात ङ्कतू लढङ्ख म्हणणारे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी असल्याने आम्ही निर्भिडपणे निसंकोच काम करीत असल्याचे या कर्मचारी योद्धांनी बोलताना सांगितले. कोरोना सारख्या अज्ञात शत्रुशी लढताना कित्येक योद्धेंना जीव गमवावा लागला तर काहींना कोरोना विषाणू अंगी जडला. मोहन शिंदे हे अग्नीशमनचे कर्मचारी यांचे काम सर्वांना ज्ञात आहे. रात्री-अपरात्री जळीत घटना किंवा आपतकालीन परिस्थितीत सर्वात पुढे शिंदे असतात. काम साध्य होईपर्यंत ते अडचणींना तोंड देणे ही त्यांची खासीयत आहे. समोरच्या कामात यश मिळो अथवा न मिळो प्रयत्न करण्यास त्यांनी कधीही मागे पुढे पाहिले नाही. या कामातून प्रत्यकक्षणी त्यांना शिकायला मिळाले आहे. मोहन शिंदेसह इतर योद्धांनी किंचीतही कर्तव्यात कसून केली नाही. त्यामुळे हे सर्व कर्मचारी विशेषत: लढ म्हणणारे अधिकारी व कर्मचारी कौतुकास, सत्कारास, अभिनंदनास व शुभेच्छांस पात्र आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही.

ज्याप्रमाणे हे कर्मचारी योद्धे 24 तास सतर्क असतात त्याचप्रमाणे यांचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे व विजय शितोळे हे ही तेवढेच सतर्क असतात. या अधिकार्यांनीही कित्येक वेळा घरी जाण्याचे टाळले. स्वत:ला स्वतंत्र ठेवले. सावधान राहुन प्रयत्नशील राहण्याचे काम यांनी केले आहे. या अधिकारी व कर्मचार्यांची लॉकडाऊन काळात व सध्या करीत असलेल्या कामातून नागरीकांमध्ये एक विश्र्वास निर्माण केला आहे. कोरोनाची भिती दूर केली आहे त्यामुळे नागरीकांना यांच्या कार्यातून बळ, आत्मविश्र्वास निर्माण झाला आहे. या सर्वांना राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, आरोग्य सभापती मयुर उर्फ कुंदन लालबिगे व सर्व समित्यांचे सभापती, खाते प्रमुखांची पाठीवर असणारी थाप कार्य करण्यास ऊर्जा निर्माण करीत आहे.
– तैनुर शेख, संपादक –