बारामती(वार्ताहर): दि.6 सप्टेंबरच्या सायंकाळी बारामतीला मुसळधार पावसाने झोडपले. कित्येक दिवस दडी मारलेल्या पावसाने घेतलेल्या गतीमुळे शहराच्या आसपास गावातील व तालुक्यात पिकांचे नुकसान झालेले आहे. कर्हा नदी दुथडी भरून वाहु लागली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कडक उन्हाने हैराण झालेल्या नागरीकांना सुखद गारव्याचा अनुभव मिळाला. जसा पावसाचा जोर वाढू लागला तसा विजेचा लपंणडाव सुरू झाला. उशिरा म्हणजे 11 वा. 15 मि. विज आली. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, कृषि अधिकारी व संबंधित गावातील तलाठी यांच्या साह्याने पिकांचे ठिकठिकाणी झालेले नुकसानीची पाहणी करण्यात येऊन तशा नोंदी घेण्याचे काम सुरू आहे.