बारामती(वार्ताहर): स्थानिक स्वराज्य संस्थांकडून यापुढे होणार्या विविध विकासकामांचा त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक लेखापरिक्षण करण्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. यामुळे कामाचा दर्जा अपेक्षित मानकाप्रमाणे होत नसल्याच्या तक्रारींवर आळा बसणार आहे.
सदरचे लेखापरिक्षण अधिक प्रभावी व परिणामकारकपणे करण्यासाठी राज्यातील नामांकित अभियांत्रिकी संस्था/शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये यांची संदर्भाधिन शासन निर्णय क्र.2 मधील प्रपत्र-अ द्वारे निवड करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनइरींग कॉलेज पुणे, शासकीय इंजिनइरींग कॉलेज कराड, शासकीय इंजिनइरींग कॉलेज औरंगाबाद, शासकीय इंजिनइरींग कॉलेज जळगाव, शासकीय इंजिनइरींग कॉलेज अमरावती, श्री गुरू गोविंद सिंग इन्स्टीट्युट ऑफ इंजिनइरींग ऍण्ड टेक्नॉलॉजी नांदेड, सरदार पटेल इंजिनइरींग कॉलेज अंधेरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोणेरे, वालचंद इंजिनइरींग कॉलेज सांगली, शासकीय इंजिनइरींग कॉलेज नागपूर व शासकीय इंजिनइरींग कॉलेज चंद्रपूर या नामांकित अभियांत्रिकी संस्था व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. असा शासन निर्णय नगर विकास विभागाचे राज्याचे सहसचिव पां.जो.जाधव यांनी प्रसिद्ध केला आहे.
Very nice