बारामती(वार्ताहर): कोरोना काळात रोटरी क्लब नेहमीच तळागाळातील गरीब लोकांबरोबर सोबत राहिली आहे सामाजिक भान आणि कर्तव्य म्हणून समाजातील आतापर्यंत पंधरा हजार कुटुंबांना रोटरी क्लबने आर्थिक हातभार दिलेला असल्याचे रोटरी क्लबचे ए.जी. ज्ञानदेव डोंबाळे यांनी बोलताना सांगितले.
एस.जी. ऍनॅलिटीक्स सॉफ्टवेअर कंपनीचे प्रमुख सुशांत गुप्ता, रोटरी क्लब ऑफ बिबेवाडीचे अध्यक्ष रो.अंकुश पारेख यांच्या सहकार्याने रोटरी क्लब बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने सोनकसवाडी गावातील गरीब शेतकरी व गरजू कुटुंबांना 25 किराणा माल किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी रोटरी क्लब बारामतीचे अध्यक्ष संजय दुधाळ, सचिव रविकिरण खारतोडे, व सर्व रोटरी क्लबचे सदस्य, तसेच सोनकसवाडी गावातील सरपंच बापूराव कोकरे उपसरपंच , तंटामुक्ती अध्यक्ष बापूराव गायकवाड, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते पोलीस पाटील राजेंद्र राजगुरू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, सूत्रसंचालन विजय फाळके यांनी केले.