बारामती(वार्ताहर): लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक ते ढवाण चौकापर्यंत डांबरीकरण त्वरीत करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे बारामती तालुका सरचिटणीस संजय वाघमारे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. या रस्त्याला कोणताही खर्च केला गेला नाही. मोठ-मोठे खड्डे पडून त्याठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असतात. सदरचा रस्ता हा दलित वस्तीतून जात असल्यामुळे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचेही तक्रारी अर्जात म्हटले आहे. तरी रस्त्याचे डांबरीकरण त्वरीत करावे अन्यथा आपल्या कार्यालयामसेर आंदोलन करण्यास भाग पाडू नये असेही दिलेल्या अर्जात म्हटले आहे.