प्रत्येक बहिणीच्या मनात कदाचित एकच विचार असेल ‌‘आज दादा असते तर‌’ – युवानेते युगेंद्र पवार

बारामतीः गेल्या सात महिन्यांत प्रत्येक क्षणी अजितदादांची उणीव जाणवत राहिली. पण आज, रक्षाबंधनाच्या दिवशी ही पोकळी आणखी तीव्रतेने जाणवते आहे. आज प्रत्येक बहिणीच्या मनात कदाचित एकच विचार असेल ‌‘आज दादा असते तर‌’ अशी प्रतिक्रीया युवानेते युगेंद्र पवार यांनी दिली.

लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळी जावून त्याठिकाणी दर्शन घेते समयी श्री.पवार बोलत होते.

अजित काका जाऊन आज सात महिने पूर्ण झाले आणि योगायोगाने आज रक्षाबंधन. आज महाराष्ट्रातल्या कित्येक बहिणींचं ओवाळणीचं ताट तयार असेल, राखीही तयार असेल पण यावर्षी त्यांच्या लाडक्या दादाचा हात राखीसाठी पुढे येणार नाही.

दादा फक्त नेते नव्हते तर महाराष्ट्रातील असंख्य महिलांसाठी ‌‘दादा‌’ होते. हक्काने आपली अडचण सांगता येणारा, आपला माणूस वाटणारा, आधार देणारा आणि जिव्हाळा जपणारे प्रत्येक लाडक्या बहिणीचे दादा होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!