बारामती(वार्ताहर): प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेविका सौ.निलिमा मलगुंडे व नगरसेवक अभिजीत उर्फ बाळासाहेब जाधव यांनी प्रत्येकाच्या घरी जावून माझा प्रभाग कोरोना मुक्त प्रभाग हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही योजना प्रभावीपणे राबविली व नागरीकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली.
बारामती नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1,2,3,5,6,7,14,17 मधील नागरिकांची तपासणी आज करण्यात आली. यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर, पंचायत समितीचे माजी गटनेते दिपकराव मलगुंडे, नगरसेविका नीलिमा मलगुंडे यांनी या योजनेचे उद्घाटन केले. आबासो मलगुंडे पाटील यांची प्राथमिक टेस्ट करत योजनेला सुरवात केली. नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी स्वागत करुन नागरिकांचे आभार मानले.