गावरान अंडी असल्याचे भासवून बॉयलर ग्राहकांच्या माथी मारणारी टीम बाजारात : नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज

बारामती(वार्ताहर): येथील तालुक्यातील पणदरे, माळेगांव, फलटण, लोणंद, खंडाळा व बारामती शहरात गावरान अंडी असल्याचे भासवून ग्राहकांच्या बॉयलर माथी मारणारी टीम बाजारात फिरून फसवणूक करीत असल्याने नागरीकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
पोल्ट्रीवरून लहान अंडी आणून मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम केले जाते. या पाण्यात चहा पावडर टाकून केमिकलचे मिश्रण करून लहान अंडी टाकून काहीवेळाने बाहेर काढून वाळवून ती बाजारात विक्रीस आणली जात आहे. ही अंडी मारूती ओमनी, टेम्पो इ. सारख्या वाहनात भरून विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे यांनी याबाबत चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी सौ.जागृती वैभव भोसले (रा.पणदरे, ता.बारामती) यांनी अन्न व औषध प्रशासन पुणे व इत्यादी ठिकाणी लेखी अर्जाद्वारे कळविले आहे.
कोरोनाचे संकट सर्वांच्या दारी आल्याने शरीराला प्रोटीन मिळणेसाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर वर्गाकडून येत असल्याने नागरीकांचा गावरान अंडी खाण्याकडे कल जास्तीचा वाढला आहे.

काय फरक आहे, गावरान आणि बॉलयर अंड्यामध्ये
1) बॉयलर अंड्यापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त पोषणमूल्य असतात. गावरान अंड्यामध्ये ओमेगा फॅटी असिडचे प्रमाण थोडे जास्त असते. जे आपले शरीर स्वत:हून तयार करत नाही ते बाहेरून घ्यावे लागते.
2) बॉयलर कोंबड्यापेक्षा गावरान कोंबड्यांचा पालन पोषणाचा खर्च जास्त असतो. गावरान कोंबड्यांची भूख जास्त असते त्यामुळे पालनपोषण खर्चिक ठरते त्यामुळे बॉयलर पेक्षा गावरान अंडी महाग असतात.
3) एका पूर्ण अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यापैकी 3.6 ग्राम प्रोटीन पांढर्‍या भागात असते.
4) डॉक्टर सांगतील त्या प्रमाणात अंडी खावी. प्रमाणापेक्षा जास्त अंडी खाल्ल्यास कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!