ठिकाणी थुंकल्यास त्यावर दंड वसुल करावा असे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सांगितलं.पुण्यात कोरोनाचा फैलाव वेगाने पसरतं असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाचली आहे. हे लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या आणि धुम्रपान करणार्या नागरिकांवर कारवाई करा, अशा सूचना गुरुवार 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समीतीची बैठकीत डॉ.देशमुख यांनी दिल्या आहेत.
या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार डॉ. राहूल मणीयार यांच्यासह स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनीधीही या बैठकीत उपस्थित होते. दरम्यान, शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर आदर्शस्थानी असल्यामुळे शिक्षकांनीही तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करु नये. त्यासाठी शाळा विभाग आणि जिल्हा परिषदेने ’तंबाखू मुक्त शाळा अभियान’चे नियोजन करावं, असंही डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटलं आहे.