मुंबई: शेतकरी योद्धे म्हणून संपूर्ण राज्यात ज्यांची ओळख आहे ते माजी खासदार व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.
राजू शेट्टी यांनी कोरोना चाचणी करून घेतली असता त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. राजू शेट्टी यांनी सोशल मिडियावर एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. पहिले काही दिवस राजू शेट्टी यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. चांगल्या वैद्यकीय उपचांरासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या पुण्यातील दिनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली राजू शेट्टी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. राजू शेट्टी यांची पत्नी तसेच मुलगा सौरभ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल देखील पॉसिटीव्ह आला आहे. राजू शेट्टी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.