बारामती(वार्ताहर): अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बारामती शहरात घरामध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून जबरी चोरी करणार्या चोरट्याला जेरबंद केल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, बारामती नगरपरिषद हद्दीत 23 ऑगस्ट 2020 रोजी पहाटे 3.15 वा चे सुमारास सलोख बिल्डींगचे दुसरे मजल्यावर समर्थनगर बारामती ता.बारामती जि.पुणे येथील श्री.महेश बापुराव जाधव याचे प्लॅटचे गॅलरीतील
दरवाजातुन बेडरूमधुन चोरटयाने प्रवेश करून फिर्यादी यांची आई झोपलेली असताना त्यांचे गळयातील मोन्याचे 15ग्रॅम वजनाचे मिनीगंठन घरफोडी चोरी करून चोरून नेहले आहे.वगैरे मजकुराचे फिर्यादी वरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले हे करीत होते.
दाखल गुन्हयाचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडुन सुरू करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, यांनी स्टाफसह भेट दिली. घटनास्थळावरून माहीती संकलीत करून स्थानिक चौकशी करून पो.नि. औदुबर पाटील यांनी दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची तपास पथके तयार करून यातील अज्ञात चोरटयाचा शोध घेणेसाठी प्राप्त माहीतीच्या आधारे वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीचा शोध घेणेकामी पथके रवाना केली.परंतु सदर गुन्हयामध्ये कोणत्याही प्रकारे परिस्थिती जन्य, वस्तुजन्य व तांत्रिक पुरावा नसल्याने पोलीस पथकापुढे मोटे आव्हान होते.तरी सदर गुन्हयाचा तपासाच्या अनुषंगाने गोपनिय बातमिदारा मार्फत बातमी मिळाली की, शिवाजी चौक येथे चार ते पाच दिवसापुर्वी एक नविन पाल राहण्या करीता आले असुन सदर ठिकाणी मुलांची रात्रीच्या वेळी सारखी येजा असते.असे सांगितल्याने आम्हाला आनखी जास्त संशय आल्याने सदर ठिकाणी मा.पोलीस निरीक्षक सो औदुंबर पाटील साो तसेच स.पोनि शिंदे पोसई गंपले, पोसई शेलार हे त्यांचे पथकासह अचानकपणे सदर ठिकाणी रात्री जावुन पालाची झंडती घेतली असता सदर ठिकाणी एक बॅटरी व पुरुषाचे जॅकेट मिळुण आले ते घेवुन आम्ही फिर्यादी यांना दाखविले असता त्यांनी ते ओळखले व त्या चोरांचे असल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणा वरून इसम नामे आकाश संपत पवार वय 25 वर्षे रा. एस.टी.स्टॅण्ड पाठीमागे बारामती ता.बारामती जि.पुणे यास ताब्यात घेवुन पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखविल्याने त्याने समर्थनगर मधील घरफोडी जबरी चोरी साथिदार नामे विक्या उर्फ हुक्या शिवा काळे रा.फलटण ता.फलटण जि.सातारा याचे मदतीने केले बाबत कबुली दिली असुन त्यानंतर सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपीत नामे आकाश संपत पवार वय 25 वर्षे रा. एस.टी.स्टॅण्ड पाठीमागे बारामती ता.बारामती जि.पुणे याचेकडुन तपासा दरम्यान 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण असलेला असा एकुण 75 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी यांना गुन्हयातील जप्त मुद्देमाल मिडीया समोर परत ताब्यात देत आहोत. तसेच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर महीला वर्गानी घाबरून न जाता पोलीस आपले सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहे. इतर दाखल गुन्हयातील जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादी यांच्या ताब्यात देण्याची तजविज ठेवली आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पी.आर.गंपले, वाय.ए.शेलार, सहा.फौजदार संदिपान माळी, पो.ना. गोरखे, पो.कॉ.पोपट नाळे, सिध्देश्वर पाटील, राजेश गायकवाड, अंकुश दळवी, सुहास लाटणे, दशरथ इंगोले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी, पोपट कोकाटे, अकबर शेख, उमेश गायकवाड यांनी केली.