छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण जगताला प्रेरणादायी – अंकिता पाटील ठाकरे

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन, त्यानिमित्त पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर नगरपालिकेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून मानवंदना दिली.

यावेळी त्या म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि विचार हे जगातील युवकांसाठी मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामान्यातील असामान्य नेतृत्व ही एक मोठी बाजू, सर्वसामान्य रयतेचा राजा – श्रीमंत योगी ही नान्याची दुसरी बाजू. शिक्षण, संस्कार, संस्कृती, युद्धनीती, राजनीती, अर्थनीती, प्रशासन, रयतेचे राज्य या प्रती आदर्शाचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक म्हणजे चारी पातशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज व स्वराज्यातील घरभेदी यांना चपराक होती. परिस्थिती प्रतिकुल असताना 400 वर्षाच्या गुलामगीरीला झुगारून बुध्दी आणि तलवारीच्या बळावर रयतेचं राज्य निर्माण करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती तरूणांसाठी स्फुर्तीदायक रसायण आहे. त्यांचे आचार आणि विचार आचरणात आणणाऱ्यांना आयुष्यात झुकण्याची वेळ येणार नाही, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!