‘लोकराज्य’ चा ‘ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण’ विशेषांक प्रकाशित

     मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाचा  सप्टेंबर 2020 चा  ‘ऑनलाईन शिक्षण-प्रशिक्षण ‘ विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे.

     सप्टेंबरच्या अंकात ऑनलाईन शिक्षण व प्रशिक्षणासंदर्भातील शासनाचे धोरण, त्याची अंमलबजावणी तसेच कौशल्य शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आदि क्षेत्रातील कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरील शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, आदिवासी  विकास, इतर मागास बहुजन कल्याण आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनांची माहिती, वन, गृहनिर्माण, आरोग्य आदि विषयीची माहिती, महत्वाच्या घडामोडी व मंत्रिमंडळाचे निर्णय इत्यादी माहितीचा या अंकात समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!