माळेगाव: शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळालेला आहे.चालू शैक्षणिक वर्षामध्ये इंजिनीअरिंग ऍडमिशनसाठी इच्छुक असणार्यां विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.या प्रवेश मार्गदर्शन कक्षाचे उद् घाटन शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री प्रमोद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी या मार्गदर्शन केंद्राचा लाभ बारावी सायन्समधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन केले.अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती मिळविण्यासाठी व काही शंका असल्यास दूर करण्यासाठी विद्यार्थी व पालक सर्व कामकाजाच्या दिवशी 10 ते 5 या दरम्यान केंद्राला भेट देऊ शकतात.या मार्गदर्शन केंद्राद्वारे विद्यार्थी व पालकांना ऍडमिशनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, ऍडमिशन प्रवेश शुल्क रचना, प्रवेश प्रक्रिया कशी पार पाडणार आहे , महाविद्यालय व शाखा कशा निवडाव्यात याविषयी माहिती मिळवु शकतात. तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी व प्लेसमेंट, प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्ती व फ्रीशिप, सरकारने जाहीर केलेल्या नवीन आरक्षणानुसार जागांची उपलब्धता, सीईटी पर्याय आणि प्रवेश पध्दती इत्यादी. प्रवेशाविषयी लागणार्या सर्व माहितीसाठी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले जाईल. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्राध्यापक राजेंद्र जाधव-9423250477, प्राध्यापक विठ्ठल चौगुले- 9762279779, प्राध्यापक जयवंत पवार – 9423228738 व प्राध्यापक योगेश खलाटे- 9158724700 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. मुकणे यांनी केले आहे. या उपक्रमासाठी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब तावरे, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे , रामदास आटोळे, गणपत देवकाते, रवींद्र थोरात व सचिव प्रमोद शिंदे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.